Posts

महेश्वर

महेश्वर विभाग आठरावा : बडोदें ते मूर               महेश्वर–  मध्यहिंस्थान, इंदूर संस्थान. नेमाड प्रांतांत नर्मदा नदीच्या काठीं हें गांव वसलेलें आहे. लोकसंख्या (१९०१) ७०४२. येथें पुष्कळ देवळें आहेत. येथील घाट व अहिल्याबाईचा राजवाडा हीं प्रेक्षणीय आहेत. महेश्वरास प्राचनी काळीं महिष्मती असें म्हणत असत. कारण येथें रेडे पुष्कळ होते व आहेत. रामायणांत व महाभारतांत याचा उल्‍लेख केलेला आढळतो. बौद्ध वाङ्मययांत हें नांव आढळतें. (राजवाडे-ज्ञानेश्वरी प्रस्तावना; रा. रा. भागवत-वि-विस्तार पृ. २२, पृ १००) या गांवी फार प्राचीन काळीं कार्तवीर्यार्जुन रहात होता अशी लोकांची समजुत आहे. कर्तवीर्यार्जुनाचे वंशज हैहय या नांवानें प्रसिद्ध होते. यांच्या ताब्यांत मध्यहिंदुस्थानाचा पूर्व भाग तीनशें वर्षें (९-१२ व्या शतकापर्यंत) होता. त्यावेळीं ही नगरी त्यांच्या राज्यांत होती. हैहयांचा चालुक्यवंशीय विनयादित्यांनीं पराभव केल्यावर हें गांव विनयादित्यांच्या ताब्यांत गेलें; पण त्यांनीं हैहयांनां तेथून हांकलून न देतां आपले मांडलिक म्हणून त्यांनां तसेंच राह...

वडगांव – (१) मुंबई, महीकांठांतलें लहानसें संस्थान.

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड वडगांव  – (१) मुंबई, महीकांठांतलें लहानसें संस्थान. (२) मुंबई, पुणें जिल्हा, मावळ तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें पुण्याहून २३ मैलांवर आहे. येथें पोटोबाचें देऊळ व उत्तम तलाव आहे. लोकसंख्या १। हजार. तालुक्याच्या कोर्टकचेर्‍या आहेत. येथें पेशवे व इंग्रज यांच्यांत मोठें युद्ध होऊन त्यांत येथें इंग्रजांचा सपशेल पराभव झाला (नाना फडणवीस पहा). वड गांवची लढाई.- फ्रेंचांनां हाताशीं धरून नाना फडणीस आपल्याला पश्चिम किनार्‍यावरून हांकलून देणार या भीतीनें मुंबईकर इंग्रजांनीं दादासाहेब यानां गादीवर बसविण्यासाठीं पुण्यावर स्वारी केली; तीस हेस्टिंग्ज यानें संमति देऊन मदतीस फौजाहि पाठविल्या. खंडाळ्यावर मराठे व इंग्रज यांची लढाई होऊन तळेगांवी त्यांचा मराठयांनीं पराभव केल्यावर (९ जानेवारी १७७९) ते मुंबईस जाण्यासाठीं परत फिरले, तों मराठी फौजा चोहींकडून धावून त्यांस बिलगल्या व त्यांनीं इंग्रजांचें ५०० माणूस मारून ७ तोफा व २ हजार बंदुका काबीज केल्या. तळेगांवापासून वडगांव गांठण्यास या इंग्रजी फौजेला १ कोसाला ''सबंध रात्र'' (१० तास) लागली, इतका मराठयांनीं त्यांनां मा...

राजपिपला संस्थान - मुंबई, रेवाकांठा पोलिटिकल एजन्सींतील संस्थान.

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड राजपिपला संस्थान  - मुंबई, रेवाकांठा पोलिटिकल एजन्सींतील संस्थान. क्षेत्रफळ १५१७ चौ. मैल. ह्याच्या उत्तरेस नर्मदा व रेवाकांठयांतील मेवासी जहागिर्‍या; पूर्वेस खानदेश जिल्ह्याच्या मेवासि जहागिरी; दक्षिणेस सुरत जिल्हा व बडोदें संस्थान; आणि पश्चिमेस भडोच जिल्हा आहे. संस्थानचा भाग सातपुडा पर्वताच्या राजपिपला टेंकडयांनीं व्यापलेला आहे. नर्मदा व करझम या दोन मुख्य नद्या आहेत. पश्चिम बाजूखेरीकरून संस्थानच्या सर्व भागांत जंगल असून त्यांत सागाची व खैरांची पुष्कळ झाडें आहेत. येथील हवा रोगट आहे. पाऊस सुमारें ४५ इंच पडतो. परमार जातीचा उज्जनीचा रजपूत राजा सैदावत याचा मुलगा चोकाराणा हा राजपिपला घराण्याचा मुळ पुरुष होता. याच्या मुलीनें गोहळ जातीच्या मोख राजाशीं लगन केलें. तिला मोखराज पासून दोन मुलगे झाले. पहिल्यानें भावनगर वसविलें व दुसरा बापाच्या गादीवर बसला. अहमदनगरच्या मुसुलमान राजांनीं ह्यापूर्वीच १००० पायदळ व ३०० घोडेस्वार पुरवावे असा संस्थानच्या राजापासून करार करून घेतला होता आणि हा करारनामा अकबर गुजराथ घेईपावेतों अमलांत होता. अकबरानें या संस्थानावर ३५५५० रुपये ख...

रामपुर, संस्थान

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड रामपुर, संस्थान. - रोहिलखंडमधील एक संस्थान. हें संयुक्तप्रांत सरकारच्या वर्चस्वाखाली आहे. याच्या उत्तरेस नैनीताल जिल्हा; पूर्वेस बरेली; दक्षिणेस बुदौन; व पश्चिमेस मुरादाबाद आहे. येथील जमीन सपाट व सुपीक आहे. उत्तरेकडील भाग तरई दलदलीच्या जमिनीसारखा आहे. संस्थानांतून पुष्कळ लहान लहान नद्या वाहातात. या सर्व नद्या संस्थानच्या दक्षिण भागांतून वहात जाणारी रामगंगा नदी हिला जाऊन मिळतात. उत्तरेकडील भाग खेरीजकरून बाकीच्या भागांत जंगल मुळीच नाही. मधून मधून आंब्याची झाडें आहेत. उत्तरेकडील भागांत चित्ते आणि वाघ आढळतात. हें संस्थान शिकारी कुत्र्यांविषयीं फार प्रसिद्ध आहे. येथील हवामान बरेली, मुरादाबाद आणि नैनिताल जिल्ह्यांसारखेंच आहे. उत्तरेकडील हवा रोगट आहे. इतिहास;-रोहिलखंडाचा इतिहास म्हणजेच या संस्थानचा पूर्वेतिहास होय. रोहिला अली महंमदानें अहमदशाह बादशहापासून रोहिलखंड हा प्रांत कायमचा मिळवून घेतला. अली महंमदाच्या मरणानंतर त्याची संपत्ति त्याच्या मुलांत वांटली गेली, तेव्हां रामपुर जहागीर त्याचा धाकटा मुलगा फैझुल्लाखान यास मिळाली. रोहिले व अयोध्येचे नबाब यांच्यांत वितु...

धार, सं स्था न.- मध्यहिंदुस्थानांत भोपावर एजन्सीपैकीं एक संस्थान.

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ धार, सं स्था न.-  मध्यहिंदुस्थानांत भोपावर एजन्सीपैकीं एक संस्थान. उ.अ.२१ ०  ५७' ते २३ ०  १५' आणि पू. रे. ७४ ०  ३७' ते ७५ ०  ३७'. क्षेत्रफळ १७८३ चौरस मैल, पैकीं १४४६ चौरस मैल खालसा म्हणजे खास दरबारच्या अंमलाखालीं असून बाकीचा जहागीरदारांकडे आहे. दुसऱ्या संस्थानांचे भाग आंत आल्यामुळें हा प्रदेश बराच तुटलेला आहे. यांत २ शहरें व ६७० गांवें आहेत. परमार रजपुतांची प्रसिद्ध राजधानी जें धार शहर त्यावरून या संस्थानचें नांव पडलें आहे. याचे विंध्यामुळें दोन स्वाभाविक भाग बनले आहेत. माळवा पठारावरचा १५ ते २५ शें फूट उंचीचा प्रदेश (क्षेत्रफळ ८६९ चौरस मैल), व विंध्यपर्वताच्या दक्षिणेकडे डोंगराळ मुलुखांतील जिल्हे संस्थानच्या उत्तरेस रतलाम, दक्षिणेस वढवाणी व इंदूर, पूर्वेस इंदूर व ग्वालेर आणि पश्चिमेस झाबवा, इंदूर व ग्वालेर हीं संस्थानें आहेत. या संस्थानांतून नर्मदा, मही, चंबळ, काली सिंध व यांनां मिळणारे पुष्कळ प्रवाह वाहतात. निमनपूर परगण्यांत धार्डी गांवाजवळ नर्मदा नदीचा मोठा धबधबा आहे त्यामुळें तेथें भोंवरे पडले आहेत. या भोवऱ्यांत एकमेकांवर घासून गळग...

पैलगांव– पंजाब, पितियाळा संस्थान.

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें            पैलगांव–  पंजाब, पितियाळा संस्थान. साहिनगड तहशिलीचे मुख्य ठिकाण. हे पतियाळा शहराच्या वायव्येस असून याची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. सन १२३६ मध्ये बंडखोर मलिक अल्लाउद्दीन जानी ह्याचा, अल्तमशची कन्या सुलताना रेझिया हिच्या एका साथीदाराने पैल जिल्ह्यात `नकावान’ येथे खून केला. अकबराच्या कारकीर्दीत हा सर हिंदचा एक परगणा होता. ह्या गांवास धार्मिक द्दष्टया बरेच महत्त्व आहे. येथे गंगासागर नांवाचा तलाव व महादेवाचे देवालय आहे. त्यास दसनामका अखाडा म्हणतात. येथे चांगल्या चांगल्या इमारती आहेत.

कच्छ - मुंबई सरकारच्या ताब्यांतील देशी संस्थान.

कच्छ  - मुंबई सरकारच्या ताब्यांतील देशी संस्थान.   मर्यादा  - उ. व. वा. सिंधप्रांत; पू. पालनपूर एजन्सींतील देशी संस्थानें द. काठेवाडचें द्वीपकल्प व कच्छचें आखात; व नैऋत्येस हिंदी महासागर.  याची लांबी पूर्वपश्चिम १६० मैल व रुंदी दक्षिणोत्तर ३५ ते ७० मैल आहे.  कच्छचें रण सोडून याचें क्षेत्रफळ ७६१६ चौ. मै. असून त्यांत ८ मोठीं गांवें व ९३७ लहान खेडीं आहेत.  कच्छचा महाराव भूज येथें रहातो.  हिंदुस्थानच्या इतर भागांपासून तुटकपणा, येथील लोकांचे विशिष्ट गुणधर्म, त्यांची निराळी भाषा, त्यांच्या राजासंबंधी वाटणारी त्यांची विलक्षण भक्ति, वगैरे गोष्टींवरून मुंबई इलाख्याच्या इतर संस्थानांपेक्षा हें एक निराळें राष्ट्र असावें असें वाटतें. स्वाभाविक वर्णन  - उत्तरेस मोठें रण, पूर्वेस छोटें रण, दक्षिणेस कच्छचें आखात व पश्चिमेस अरबी समुद्र असल्यामुळें हा प्रदेश हिंदुस्थानापासून बहुतेक वेगळा आहे.  जरी एकंदरींत हा देश रुक्ष, ओसाड व खडकाळ असला तरी डोंगराच्या रांगा व तुटक शिखरें, नद्यांचीं खोल पात्रें, लागवड केलेली खोरीं व चराईच्या जागा, यांमुळें याला विविधता प्राप्...