पैलगांव– पंजाब, पितियाळा संस्थान.

विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें   
       
पैलगांव– पंजाब, पितियाळा संस्थान. साहिनगड तहशिलीचे मुख्य ठिकाण. हे पतियाळा शहराच्या वायव्येस असून याची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. सन १२३६ मध्ये बंडखोर मलिक अल्लाउद्दीन जानी ह्याचा, अल्तमशची कन्या सुलताना रेझिया हिच्या एका साथीदाराने पैल जिल्ह्यात `नकावान’ येथे खून केला. अकबराच्या कारकीर्दीत हा सर हिंदचा एक परगणा होता. ह्या गांवास धार्मिक द्दष्टया बरेच महत्त्व आहे. येथे गंगासागर नांवाचा तलाव व महादेवाचे देवालय आहे. त्यास दसनामका अखाडा म्हणतात. येथे चांगल्या चांगल्या इमारती आहेत.

Comments